आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील एकमुखी दत्त मंदिराच्या पाठीमागील परिसरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली. शिवाजी श्रीराम काकड (६५) व कुटुंबीय सकाळी साडेनऊ वाजता घराला कुलूप लावून शेतात गेले होते. अज्ञात चोट्याने संधी साधत दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
साहित्याची उचकापाचक करत कपाटात ठेवलेली अर्धा तोळ्याची सोन्याची नथ, अर्धा तोळ्याचे ओम पान, सोन्याचे २० मनी व १५ हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. ११.३० वाजता काकड कुटुंबीय घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सिन्नर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.