आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकसर्किट:चाऱ्यासह ट्रक जळून खाक; वायरिंगमध्ये शॉकसर्किट झाल्याचा अंदाज

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांना आणलेल्या चाऱ्यासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना वडझिरे येथे शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. यामुळे ट्रकचे मालक सचिन संपत नागरे यांचे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. नागरे यांनी शुक्रवारी जनावरांसाठी गुळवंच येथून ट्रकमध्ये चारा आणला होता. चाऱ्यासह ट्रक घरासमोर मैदानात उभा केला. मध्यरात्री दोनच्या सुमारास आगीचे लोट व धुरामुळे नागरे यांना जाग आली.

बाहेर येऊन पाहिले तर ट्रक (एमएच १५ सीके २१२२) जळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तातडीने सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. चालक नवनाथ जोंधळे, फायरमन लाला वाल्मीकी, जयेश बोरसे, लक्ष्मण सोनकुसरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत ट्रक व चारा जळून खाक झाला होता. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. ट्रकच्या वायरिंगमध्ये शॉकसर्किट झाले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हवालदार एम. एस. मानकर, शशिकांत निकम तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...