आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम किसान सन्मान:पीएम योजनेसाठी केवायसीचे आवाहन

बोरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएम किसान सन्मान निधी योजनेतील सुरगाणा तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी केवायसी लवकर करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन मुळीच यांनी केले आहे. यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आलेली आहे. याबाबत पात्र लाभार्थ्यांना केवायसीसाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान https:pmkisan.gov.in या वेबसाईटवर पीएम किसान ॲपद्वारे ओटीपी लाभार्थ्यांना केवायसी मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र सीएससी केंद्रावर केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करता येईल. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी केवायसी प्रकिया ३१ ऑगस्टपर्यंत करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत केवायसी न करणाऱ्या पात्र लाभार्थी पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हफ्त्याचा लाभ दिला जाणार नाही, असे आवाहन तहसीलदार सचिन मुळीक, राजेंद्र मोरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...