आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:सिन्नर रोटरी क्लबतर्फे शिबिर ७५ बॅगा रक्त संकलन

सिन्नर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ सिन्नर आणि पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७५ बॅगा रक्त संकलन करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे अध्यक्ष निशांत माहेश्वरी यांनी प्रथम रक्तदान करीत उपक्रमाचे उद‌्घाटन केले. सोबत रोटरीच्या २० सदस्यांनीही रक्तदान केले. सिन्नरच्या सुजाण नागरिकांनीही रक्तदान करत ७५ बॅग रक्त पेढीला दिल्या. सर्व रक्तदात्यांसाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रोटरीचे अध्यक्ष निशांत माहेश्वरी यांनी क्लबच्या वतीने देशाच्या अमृतमहोत्सवी आपल्या उपक्रमातून मानवंदना दिल्याचे सांगितले. सिन्नरकरांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल आभार मानले.

पवार जनरल हॉस्पिटलचे संचालक डॉ. जी. एल. पवार, डॉ. सुशील पवार, डॉ. वर्षा गायकवाड यांनी रक्तदान शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले. यावेळी रोटरी क्लबचे सचिव सुनील ढाणे, माजी अध्यक्ष वैभव मुत्रक, संस्थापक अध्यक्ष कैलास क्षत्रिय, दत्ता गोळेसर, रमेश कानडे, नाना भगत, संजय आनेराव, सुयोग कानडे, उदय गायकवाड, मनोज गुंजाळ, संजय आव्हाड, परिश जुमनाके, रविराज गोळेसर, आदित्य क्षत्रिय आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...