आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार व दुचाकीचा अपघात, एक ठार; कार व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार

येवला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-मनमाड महामार्गावर अनकाई किल्ल्याजवळ आंबेवाडी शिवारात कार व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला.

येवल्यावरून मनमाडकडे जाणारी कार (एमएच ०९ डीए ७७७८) आणि मनमाडकडून येवल्याकडे येत असलेली दुचाकी (एमएच १५ सीक्यू १५१२) यांच्यात समोरासमोर अपघात होऊन दुचाकीस्वार रवींद्र अनंता जोशी (५५) यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांनी जोशी यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात किरण जोशी यांच्या फिर्यादीवरून कारचालक विशाल शिवाजी जाधव (३२, रा. आचवली, ता. देवणी, जि. लातूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...