आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठार:नियंत्रण सुटल्याने कार दरीत; 1 ठार तर दोनजण जखमी

सिन्नर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार २०० फूट खोल दरीत कोसळली. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. यात एकजण ठार तर दोनजण जखमी झाले आहेत. अंकुश संतू जमदाडे (३८, रा. आवळी, ता. इगतपुरी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर अनिल गोपाळ भोर (रा. रायगोंदे, ता. इगतपुरी), नामदेव किसन धांडे (रा. भगूर, ता. शेवगाव) हे जखमी झाले. टियागो कारने (एमएच १५ जीएल २७४५) तिघेजण सिन्नरहून घोटीकडे जात होते. घोरवड घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. अनिल भोर व नामदेव धांडे हे जखमी अवस्थेत दरी चढून महामार्गावर आले. घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, सुदाम धुमाळ, पोलिस नाईक विनायक आहेर, नवनाथ शिरोळे, रवींद्र चिने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकाचालक पुरुषोत्तम भाटजिरे, शुभम कातकाडे यांनी जमदाडे यांना वर आणले. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...