आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूप्रकरणी गुन्हा:बेपत्ता महिलेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा

पिंपळगाव बसवंत22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच दिवसांपासून बेपत्ता विवाहितेचा मृतदेह आढळल्यानंतर पतीसह ४ जणांवर सोमवारी (दि. ६) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरवाडे वणी येथे माहेरी आलेल्या दीपाली राजेश ढिकले (३२, रा. सय्यदपिंप्री) ही महिला पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची फिर्याद पिंपळगाव पोलिसांत दिली होती. सोमवारी (दि. ६) पिंपळगाव -चांदवड महामार्गालगत असलेल्या हॉटेलजवळ दीपालीचा मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर दीपालीचे वडील बाळू हरी निफाडे यांनी पिंपळगाव पोलिसांत दाखल फिर्यादीमध्ये दीपालीचे पती राजेश नामदेव ढिकले, सासरे नामदेव भगवंत ढिकले, सासू सुमनबाई नामदेव ढिकले, दीर योगेश नामदेव ढिकले व नणंद रेखा शंतनू ओतूरकर हे तिचा पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ करत हाेते. पती राजेश ढिकले यांनी तिची हत्या करत मृतदेह महामार्गावरील हॉटेलजवळ पुरावा नष्ट करण्याचा हेतूने टाकल्याचा आरोप केला. या घटनेनंतर पतीसह चार जणांवर पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...