आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अभोण्यात पानमसाला व तंबाखूसह‎ 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त‎

अभोणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎येथील गिरणा नदीच्या पुलावरून‎ दुचाकीने जाणाऱ्या दोघा‎ व्यक्तींकडून अभोणा पोलिसांनी‎ प्रतिबंधित पानमसाला, तंबाखूसह‎ सुमारे १ लाख १५ हजार रूपये‎ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.‎ राज्यात प्रतिबंधित असलेला‎ पानमसाला, तंबाखू सापुतारा येथून‎ चोरट्या मार्गाने आणून अभोणा मार्गे‎ पल्सर दुचाकीवरून वाहून नेणाऱ्या‎ दोघा संशयितांना ताब्यात घेऊन‎ त्यांचेकडून दोन मोबाइलसह एकूण‎ १ लाख १४ हजार ३२८ रूपये‎ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.‎ याप्रकरणी नितीन देवीदास पगार,‎ अभिषेक बाळासाहेब रणपिसे (रा.‎ रसलपूर फाटा, निफाड ) यांच्यावर‎ गुन्हा दाखल केला करण्यात आला‎ आहे.‎

येवला : 70 हजारांचा गुटखा जप्त‎
शहर परिसरातील अमिना नगर‎ भागात एका घरात अवैधरित्या‎ गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी‎ छापा मारून जप्त केला आहे. सुमारे‎ ७० हजार ४३८ रुपयांचा गुटखा‎ हस्तगत केला आहे.‎ अमिना नगर भागात राहणाऱ्या‎ संशयित युसूफ गुलाब खान पठाण‎ याने त्याच्या राहत्या घरात‎ अवैधरित्या गुटख्याचा साठा‎ ठेवल्याची गुप्त माहिती शहर पोलिस‎ ठाण्याला मिळाली होती.

यानुसार‎ सहायक पोलिस निरीक्षक नितीन‎ खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक‎ सूरज मेढे, हवालदार राकेश‎ होलगडे, शाहनवाज शेख, गणेश‎ पवार, वंदना वाघ आदींच्या पथकाने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घरात छापा मारला. या कारवाईत‎ पोलिसांनी सुमारे ७० हजार ४३८‎ रुपयांचा गुटख्याचा साठा हस्तगत‎ केला आहे. दरम्यान संशयित युसूफ‎ गुलाब खान पठाण (रा. अमिना‎ नगर, येवला) व फैजान खान‎ फिरोज खान (रा. आयनानगर)‎ मस्जिदजवळ, येवला) हे दोघे‎ फरार झाले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...