आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारंगपंचमी साजरी करताना नैसर्गिक रंग वापरावेत. नैसर्गिक रंग बनवून पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करावी, असे मार्गदर्शन माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांनी केले. पंचाळे येथील पंचाळे येथील सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालयात पर्यावरणपूरक होळी व धूलिवंदन सण साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राजेश गडाख यांनी नैसर्गिक रंगाचे लाभ आणि रासायनिक रंगांचे अपाय यावर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पाना-फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करत असताना झाडाच्या वाळलेल्या पाने व फुलांपासून रंग निर्मिती, डाळिंबाच्या सालीपासून नारंगी रंग, हळद व बेसन यापासून पिवळा रंग, रक्त चंदनाच्या पावडरपासून लाल रंग, बीटापासून लाल रंग, पालेभाज्यांपासून हिरवा रंग, आवळ्यापासून काळा रंग निर्मिती करावी. यापुढे नैसर्गिक रंग बनवून तेच रंग वापरण्याची शपथ देण्यात आली.
राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या चुकीच्या सवयी जसे, उशिरा उठणे, मोबाईलचा अती वापर, अस्वच्छता, आळस अशा सवयी कागदावरती लिहून त्याचे होळीत दहन केले. सण-उत्सव हे माणसाचा आनंद वाढवण्यासाठी आलेले असतात. सणामागे धार्मिकतेबराेबरच वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. तो आपण समजून घेतला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी नूतन वर्षाची सुरुवात चांगल्या संकल्पांनी करा. स्वतःला, कुटुंबाला, समाजाला ज्या विघातक गोष्टी आहेत त्यांचा या होळीमध्ये त्याग करा, असाही संदेश गडाख यांनी याप्रसंगी दिला.
प्राचार्य शांता शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक आर. एस. गडाख, स्काउट समुपदेशक विश्वनाथ शिरोळे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रवीण शेलार, राधाकिसन कहांडळ, विलास पवार, नलिनी लोखंडे, विनायक पगार, मयुरी हिवरडे, शीतल नाजगड, अंजली डुंबरे, पुजा जगदाळे, नामदेव हांडोरे, लता बेलोटे, दत्तू थोरात, विकास वाघ, योगेश डुंबरे आदी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.