आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव:कमलाक्षी बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्पर्धांमधील विजेत्यांचा गाैरव

कळवणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कमलाक्षी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण नुकताच पार पडला. १२ वर्षा पासून जिल्हास्तरीय वक्तृत्व, चित्रकला व काव्यवाचन तर राज्यस्तरीय निबंध व प्रेमपत्र स्पर्धा आयोजित केल्या जातात. या वर्षी या स्पर्धा नुकत्याच आर. के. एम. शाळेत झाल्या. विविध तीन वयोगटांत झालेल्या स्पर्धेत १६ जिल्ह्यांतून ५९८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस प्रा. सुनील बच्छाव, रवींद्र गांगोले, भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, रमाकांत मंत्री, विकास काकडे, प्रमोद मुळे, गजानन सोनजे, राजेंद्र खैरनार, प्रवीण संचेती, विसावे, नामदेव शेवाळे, प्रवीण घुले, डी. एस. पवार, संजय सोनवणे, प्रशांत गांगुर्डे, देवमन बच्छाव आदी उपस्थित होते. प्रा.बच्छाव यांनी कमलाक्षी बहुउद्देशीय संस्थेने विविध स्पर्धांच्या माध्यमातून देशसेवेसाठी जनजागृती करून सामाजिक सलोखा जपण्याचे पवित्र कार्य केले असल्याचे सांगितले.

याप्रसंगी कमलाक्षी संस्थेचे संस्थापक दीपक वेढणे यांनी संस्थेच्या विविध कामांची व कोविडकाळात केलेल्या रुग्णसेवेची माहिती दिली. प्रेमपत्र स्पर्धेमुळे दोन पती-पत्नीमधील बेबनाव कसा संपुष्टात येऊन त्यांचा संसार सुखाचा कसा सुरू झाला हे सांगितले. सूत्रसंचालन पवन कोठावदे व भास्कर शिरोरे यांनी तर संस्थेचे अध्यक्ष एस. के. पगार यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी कार्याध्यक्ष भास्कर शिरोरे, कोषाध्यक्ष प्रा. पवन कोठावदे, उपाध्यक्ष हेमंत बिरारी, सचिव रजनीकांत देशमुख, पंकज मेणे, विजय सूर्यवंशी, नीलेश दुसाने, अजय कोठावदे, भाऊसाहेब जोर्वेकर, नीलेश अमृतकर, मोहन आहेर, महेश महाजन, प्रशांत नेरकर, किशोर धांडे, उत्तमराव शेवाळे, मंजूश्री देवघरे, साधना कोठावदे, सुवर्णा पगार, सुनीता साळुंखे, शालिनी कोठावदे, स्नेहल देशमुख, माणिक साळुंखे, महेश कोष्टी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...