आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:स्टाइसमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे धडे

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक वसाहती मधील उद्योजक सभासदांना कुशल कर्मचारी, कामगारांची उपलब्धता सहजगता व्हावी, यासाठी मिटकॉन कन्सल्टन्सी ॲंड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड पुणे आणि स्टाइस यांच्या वतीने औद्योगिक वसाहतीत ‘प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ सुरू करण्याचा निर्णय स्टाइसच्या संचालक मंडळाने घेतला आहे. १ डिसेंबरपासून एमएससीआयटी, टॅली- जीएसटी, स्टोअर कीपर, सूक्ष्म - लघुउद्योग व्यवस्थापक या ४ विषयांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रत्यक्षात सुरू केला जाणार असल्याची माहिती औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे, व्हा. चेअरमन सुनील कुंदे यांनी दिली.

औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना टॅली जीएसटीचे काम करणारे तज्ज्ञ कर्मचारी स्थानिक स्तरावर उपलब्ध होत नसल्याने ज्यादा वेतन देऊन ही गरज पूर्ण करावी लागते. तालुक्यातील स्थानिक सुशिक्षित तरुण कुशल नसल्याच्या कारणास्तव त्यांना या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हा अभ्यासक्रम औद्योगिक वसाहतीत सुरू करून कुशल कर्मचारी घडवण्याचा निर्णय औद्योगिक वसाहतीने घेतला आहे.

३० विद्यार्थ्यांची एक बॅच, प्रतिदिन एक तास प्रशिक्षण एमएससीआयटी साठी दहावी किंवा बारावी पदवीधारक यांच्यासाठी सहा महिन्याचा कालावधीच्या हा कोर्स असून प्रतिदिन एक तास प्रशिक्षण दिले जाणार आहे. टॅवी - जीएसटी साठी वाणिज्य व तत्सम पदवीधारकांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळेल.

सहा महिन्याचा कालावधीत प्रतिदिन १ तास प्रशिक्षण दिले जाईल. स्टोअर किपर, सूक्ष्म लघुउद्योग व्यवस्थापक यासाठी कुठल्याही शाखेच्या पदवीधारकांना प्रत्येकी एक महिना प्रतिदिन अनुक्रमे चार आणि ३ तास याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व कोर्सेससाठी ५ हजार रुपये अधिक जीएसटी असे प्रशिक्षण नाममात्र प्रशिक्षण शुल्क आकारले जाणार आहे. चारही कोर्सच्या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची एक बॅच तयार केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...