आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:चाळीसगाव फाट्यावर आज चक्काजाम ; सर्वपक्षीय आंदोलनाचे आवाहन

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरी -आंबेदरी धरण बंदिस्त कालव्याच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी ७ नाेव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करूनही शासन प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे दोघा आंदोलक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व दादा भुसे यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी दुपारी ३ वाजता मुंबई -आग्रा महामार्गावर सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे.

बोरी-आंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी २९ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. यातील आंदोलक गणेश कचवे व शिवाजी भामरे यांची प्रकृती गंभीर असून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी व राजकीय नेत्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...