आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांदवड मर्चंट बँकेने आर्थिक वर्षात १११ कोटी ठेवींचा टप्पा पार केलेला आहे. आगामी काळात १५० कोटीचा टप्पा पार करण्याचे लक्ष ठेवले आहे. बँकेने ग्राहकांसाठी आरटीजीएस, एनएफटी, सीटीएस क्लिअरिंग, लाईट बिल, टेलिफोन बिल भरणा, ठेवीवर पाच लाखापर्यंत विमा संरक्षण, मोबाईल बँकिंग, लॉकर, एटीएम सुविधा सुरू केल्या आहेत. आगामी काळात लवकरच फोन पे, गुगल पेसारख्या सुविधा सुरू करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र कासलीवाल यांनी सांगितले. दि चांदवड मर्चंटस को-ऑप. बँकेच्या उमराणा येथील नूतन शाखेचे उद्घाटन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे होते. यावेळी बाजार समिती सभापती प्रशांत देवरे,संचालक सुनील देवरे, पंचायत समिती उपसभापती धर्मा देवरे, नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. सुरेश पाटील यांनी केले. यावेळी संघपती शांतीलाल मोदी, ज्येष्ठ सदस्य कवरीलाल बाफना, माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, डॉ. रमेश गायकवाड, नंदन देवरे, बँकेचे उपाध्यक्ष सईद शेख, संचालक अशोक व्यवहारे, राजकुमार संकलेचा, सुनील कबाडे, दत्तात्रय राऊत, भिकचंद व्यवहारे,आदित्य फलके, पुष्पा बिरार, जाहिद घासी, राहुल कोतवाल, जाकीर शाह, शंभूराजे खैरे, भारती देशमुख, नूतन भालके, डॉ. पी. आर. सोहनी, पराग आचार्य, मनीष टाटिया आदींसह व्यापारी बांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यशस्वितेसाठी बँकेचे सीईओ सचिन सूर्यवंशी, शाखा व्यवस्थापक अनिल सांगळे, वडाळीभोई शाखाप्रमुख परवेज पठाण, उमराणा शाखाप्रमुख आर. पी. सोनवणे व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.