आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:चांदवड : 34 ग्रामपंचायतींसाठी 84.67% मतदान

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी ८४.६७ मतदान झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील व निवडणूक शाखेचे दिलीप मोरे यांनी दिली. ३४ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ५८१३९ पैकी ४९२२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २३२३० महिला तर २५९९८ पुरुषांनी मतदान केले.

मतदारांमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच उत्साह दिसून आला. सकाळी व दुपारी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. तालुक्यातील दुगाव व शेलू येथे तांत्रिक कारणाने ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मात्र तेथे तातडीने मशीन बदलून मतदान सुरू केले, त्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा आला नाही. उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केले. मंगळवारी (दि. २०) सकाळी दहा वाजता चांदवड येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मतमोजणीस प्रारंभ होईल. १६ टेबलवर ८ फेरीत दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत निकाल हाती येतील असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...