आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठवडे बाजारतळातून दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापल्याने तो गंभीर जखमी झाला. मांजा काढताना तीन बोटेही कापली गेली असून गळ्याला सहा टाके पडले आहेत. बुधवारी (दि. ७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
तालुक्यातील शिंदेे येथील राजेश कचेश्वर शिंदे (४०) हे दुपारी दुचाकीवरून (एमएच १४, जीके २३९८) चांदवडच्या आठवडे बाजारतळातून कामानिमित्त तहसील कार्यालयाकडे जात होते. त्यावेळी भाजी मंडईजवळ अचानक आलेल्या नायलॉन मांजाने त्यांचा गळा कापला. गळ्याला अडकलेला मांजा काढताना त्यांची तीन बोटेही कापली जाऊन बोटांनाही गंभीर जखम झाली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांच्या गळ्यातील नायलॉन मांजा काढून त्यांना जवळील दवाखान्यात दाखल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.