आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांदा भावातील घसरणीमुळे कांदा उत्पादकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कांदाप्रश्नी केंद्र व राज्य सरकारने ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी झोपलेल्या सरकारला जाग आण्यासाठी कांद्याला हमीभावासह विविध मागण्यांसाठी दि. ३ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसमवेत पक्षविरहित बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार कोतवाल म्हणाले की, सद्यस्थितीत कांद्याला उत्पादनखर्चाच्या तुलनेत कवडीमोल भाव मिळत आहे.
दाेन हजार रुपये क्विंटलला खर्च येणाऱ्या कांद्याला ४०० रुपये क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना सरकारने शेतकऱ्यांना सबसिडी देण्याऐवजी उलट शेतकरी केंद्र सरकारला १६०० रुपये रिव्हर्स सबसिडी देण्याचा हा प्रकार आहे. हीच अवस्था द्राक्ष उत्पादकांचीही असल्याने याबाबत गावागावात बैठका घेऊन शेतकऱ्यांना संघटित केले जात असून केंद्र व राज्य सरकारविरोधात हे उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणादरम्यान शेतकऱ्यांच्या निर्णयानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती माजी आमदार कोतवाल यांनी यावेळी दिली. या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय जाधव, भीमराव जेजुरे, अॅड. अन्वर पठाण, बापूसाहेब शिंदे, ओंकार नेटारे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.