आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध:चांदवड कृउबा जिल्ह्यात सहाव्या क्रमांकावर

चांदवड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यात चांदवड बाजार समितीला जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांपैकी सहाव्या क्रमांकाची रॅकिंग मिळाली आहे.जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्यातून महाराष्ट्र राज्य पणन संचालनालय राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुधारणा घडवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याकामी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत शेतीमाल विक्री व्यवस्थेमध्ये बाजार समितीत असलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, बाजार समितीच्या योजना, उपक्रम याकरीता ३५ निकष तयार करण्यात आले होते. या निकषांप्रमाणे तालुका उपनिबंधकांकडून तपासणी करून बाजार समित्यांना गुण देण्यात आले. चांदवड बाजार समितीतील विविध सुविधांची पाहणी करून १२९.५० गुण देण्यात आलेले असून या क्रमवारीत चांदवड बाजार समिती राज्यात ३४ व्या, नाशिक विभागात १२ व्या तर नाशिक जिल्ह्यात ६ व्या क्रमांकावर आहे. बाजार समितीच्या विकासामध्ये शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, मापारी, हमाल व अन्य बाजार घटकांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १७ बाजार समितीत्यांचा क्रम असा:
१) लासलगाव, २) पिंपळगाव (ब), ३) येवला, ४) नामपूर, ५) सिन्नर, ६) चांदवड, ७) नाशिक, ८) घोटी बु., ९) देवळा, १०) कळवण, ११) सटाणा, १२) नांदगाव, १३) दिंडोरी, १४) मालेगाव, १५) मनमाड, १६) उमराणे, १७) सुरगाणा.

बातम्या आणखी आहेत...