आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:चांदवडला 75 रक्तदात्यांचे रक्तदान

चांदवड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, श्री आर. पी. चोरडिया हॉस्पिटल चांदवड, अर्पण ब्लड बँक, नाशिक व महाकाल ग्रुप गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व मोफत सर्वरोग होमिओपॅथिक निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा ५३ गरजू रुग्णांनी लाभ घेतला तर ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिर यशस्वितेसाठी नेमिनाथ संस्थेचे संचालक नंदकुमार ब्रह्मेचा, डॉ. सुनीलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. अजय दहाड, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील जांगडा, डॉ. प्रकाश कबाडे, डॉ. शालिनी शर्मा व आंतरवासीय विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाकाल ग्रुपचे अध्यक्ष तुषार सोनवणे, उपाध्यक्ष राज कोतवाल, आकाश शेळके, शुभम कोतवाल, शुभम घुले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...