आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्त्रोद्योग उपायुक्त 15 लाख रुपयांची लाच घेताना चतुर्भुज:सोयीस्कर निकाल देण्यासाठी 30 लाखांची मागणी

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव येथील तक्रारदाराने दाखल केलेल्या अपिलाच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाखांच्या लाचेची मागणी करत तडजोडीअंती १५ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मुंबई वस्त्रोद्योग उपप्रादेशिक उपायुक्त अजितकुमार सासवडे यास बुधवारी दुपारी अटक करण्यात आली. बृहन्मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. गुरुवारी दुपारी वस्त्रोद्योग कार्यालयाबाहेर १५ लाख रुपयांची लाच घेताना सासवडेला पोलिस निरीक्षक पंकज शिंदेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

संस्थेने शेअर्स होल्डरचा अर्ज फेटाळल्याने केले होते अपील मालेगाव शहरात दी पक्का रंग साडी को-ऑप. असोसिएशन लिमिटेड संस्था आहे. तक्रारदाराने शेअर्स होल्डर होण्यासाठी शेअर्स फी भरून संस्थेकडे अर्ज केला होता. मात्र, अर्ज फेटाळल्याने त्यांनी मुंबईच्या वस्त्रोद्योग विभाग व अपिलाच्या अनुषंगाने तक्रारदार व इतर २० जणांनी उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. न्यायालयाने उपायुक्तांना ४ फेब्रुवारीपूर्वी अर्ज निकाली काढावा, असे आदेशित केले होते.

बातम्या आणखी आहेत...