आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शिक्षण संस्थेच्या चाैकशी करा ; टीडीएफची निदर्शने

मालेगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुकाणे येथील एका शिक्षण संस्थेच्या चाैकशीची मागणी करत जिल्हा टीडीएफच्या नेतृत्वाखाली साेमवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घाेषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन साेपविण्यात आले.कुकाणेस्थित एका शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार हाेत असल्याचा आराेप टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम यांनी केला आहे. विद्यार्थ्यांकडून पैसे उकळून त्यांना पास करून देण्याची हमी दिली जात आहे. नाशिक, मुंबई, पुणे, महाबळेश्वर येथील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावीसाठी प्रवेश दिला जात आहे.

संस्थेचे मुख्यध्यापक, शिक्षक संघटनेच्या आडून हे गैरप्रकार करत असल्याचा आराेपही निकम यांनी केला आहे. संस्थेच्या विद्यालयाशेजारी वजीरखेडे येथील मंदिर ट्रस्टची जागा आहे. सदर जागा हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला हाेता. मात्र, ग्रामस्थांनी तातडीने ग्रामसभा घेत ट्रस्टची जागा न देण्याचा ठराव केला आहे. संस्थेची उच्चस्तरीय चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. निदर्शने करताना आर. डी. निकम, साहेबराव देवरे, एस. पी. खैरनार, टीडीएफचे कार्यवाह आशिष पवार, जयेश सावंत, शिक्षक भारतीचे महानगराध्यक्ष सुधीर पाटील, आर. के. शिराेडे, गाैतम देवरे उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...