आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे यांचा मालेगाव मुक्काम चर्चेत:संवेदनशील मालेगावमध्ये प्रथमच मुख्यमंत्र्यांचा मुक्काम

मालेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी मालेगाव मुक्कामी येत असल्याने येथील गिरणा विश्रामगृहाची रंगरंगोटी करण्यासाठी धावपळ सुरू आहे.फर्निचरची दुरुस्ती व काही नविन खरेदी करत खोल्यांना रौनक भरण्याची धडपड असून शहरात अति महत्वाच्या व्यक्तींसाठी रात्रभर राहण्यासाठी सुविधायुक्त व सुरक्षित हॉटेलची वाणवा असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या मुक्काम ठिकाणी रात्रभर पोलिसांचा खडा पाहरा नियुक्त करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा मालेगाव मुक्काम सध्या चर्चेत आला आहे. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगाव शहरात राजकीय अति महत्वाच्या व्यक्तींसाठी मुक्कामाचा निर्णय ही पहिलीच घटना ठरणार आहे. तसेच शहराचा इतिहास पाहता शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाच्या सत्तेतील अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने मालेगाव मुक्काम ही देखील देशासाठी लक्षवेधी घटना ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...