आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त दाद:आत्माविष्कारात  चिमुकल्यांच्या नृत्याविष्कारांनी भरला जल्लोष; येवल्यात आत्मा मालिक गुरुकुलमध्ये स्नेहसंमेलन

येवला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल शाळेचे आत्माविष्कार स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने चांगलाच जल्लोष भरला. चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थित पालक, शिक्षक व उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यामुळे त्यांचाही उत्साह चांगलाच वाढला होता.

महात्मा फुले नाट्यगृहात आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल या शाळेच्या आत्माविष्कार स्नेहसंमेलनाचे उद‌्घाटन ‘वारकरी दर्पण’ मासिकाचे संपादक सचिन पवार यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. संगीता नांदूरकर, हनुमंत भोंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले, चांगले व दर्जेदार शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. चांगले शिक्षण असेल तर सर्व क्षेत्रांत संधी आपोआप मिळते. प्रापंचिक यश लाभते. पैसे, सन्मान, सुख संपादन करण्यासाठी गैरमार्गांचा वापर टाळावा, असेही त्यांनी सांगितले.

तहसीलदार हिले यांनी सांगितले की, आपल्या ध्येयाशी, कष्टाशी प्रामाणिक रहा यश नक्की मिळेल. विद्यार्थिदशेत अभ्यास करणे हा विद्यार्थ्यांचा गुणधर्म असतो. त्यामुळे आदर्श नागरिक, आदर्श माणूस म्हणून निश्चित यशस्वी व्हाल. मुख्याधिकारी डॉ. नांदूरकर यांनी संस्कृती टिकविणे आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांनी गुरुकुलाच्या विविधांगी शिक्षण आणि त्याची उपयुक्तता पालकांनी समजावून घेतल्यास भविष्यात प्रगतीची द्वारे खुली होतील, असे सांगितले.

उद‌्घाटनानंतर आत्माविष्कार स्नेहसंमेलन जल्लोषात पार पडले. चिमुकल्यांनी नृत्याविष्कार सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गुरुकुलातील श्रुती महाजन व पार्थ महाजन यांनी सर्वश्रेष्ठ धार्मिक ग्रंथ श्रीमद‌् भगवद‌्गीतेतील सुमारे ७०० श्लोक पाठांतर केले म्हणून आणि पालकांनी त्यांना घडविले म्हणून सत्कार करण्यात आला. प्राचार्य तुषार कापसे यांना एज्युकेशनल रिफोरमेर हा पुरस्कार मिळाला तसेच सोनाली घोडके यांना कलामित्र पुरस्कार मिळाल्याने सत्कार त्यांचा करण्यात आला.

यावेळी रामभाऊ झांबरे, हेमंत शहा, संत सेवादास महाराज, संत कंकाली महाराज, ब्रह्माकुमारी सरलादिदी, ब्रह्मकुमारी नीतादिदी, प्राचार्य योगेश सोनवणे उपस्थित होते.सूत्रसंचालन नेहा शाह व ऊर्मिला भड यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...