आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमत‎:धर्मांतरित आदिवासींच्या सवलती बंद‎ करण्याचा चिंचवड धर्म संसदेत ठराव‎

हरसूल‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील सर्व धर्मांतरित‎ आदिवासींच्या शासकीय योजना व‎ सवलती बंद कराव्यात असा ठराव‎ चिंचवड-खोरीपाडा येथील धर्मसभेत‎ एकमताने संमत करण्यात आला.‎ काशीनाथ महाराज भोये (ओझरखेड‎ धाम) यांच्या अमृत महोत्सवी‎ अभीष्टचिंतन निमित्त महामंडलेश्वर‎ रघुनाथ देवबाप्पा फरशीवाले यांच्या‎ मार्गदर्शनाखाली चिंचवड खोरीपाडा‎ येथे एक दिवसीय धर्मसंसद व शाही‎ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले‎ होते. यात महाराष्ट्रातील विविध‎ ठिकाणाहून साधू महंत सामील झाले‎ होते.‎

चिंचवड खोरीपाडा येथील‎ काशीनाथ महाराज आदिवासी‎ भागातील पहिले सर्व कुंभ करणारे महंत‎ असून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून‎ आदिवासींमध्ये जनजागृती करून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ धर्मांतर रोखण्यात त्यांनी यश‎ मिळविले, असे गौरवोद्गार धर्म‎ संसदेचे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ.‎ रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी‎ काढले. यावेळी महामंडलेश्वर‎ संविदानंद सरस्वती, महंत रामसनेही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गुरू नारायणदास महाराज यांच्यासह‎ उपस्थित साधू महंतांचे काशीनाथ‎ महाराज यांनी स्वागत केले. यावेळी‎ अमृताश्रम स्वामी महाराज,‎ अमृतदासजी रमणगिरीजी महाराज,‎ महामंडलेश्वर रामकिशोर दासजी‎ शास्त्री, महामंडलेश्वर भक्तिचरणदास‎ महाराज, महामंडलेश्वर फलाहारी‎ महाराज, सच्चिदानंदजी महाराज,‎ प्रेमदासजी महाराज, कुरेकर बाबा,‎ महामंडलेश्वर ईश्वरदासजी चऱ्हाटे‎ महाराज, महंत दिव्यानंद महाराज,‎ खंडेश्वरजी महाराज यांच्यासह अनेक‎ साधू महंत उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर‎ येथील कुंभमेळ्यावेळी अनुभवलेली‎ शाही मिरवणूक आदिवासी बांधवांनी‎ पाहून आनंद व्यक्त केला. धर्म संसदेस‎ जिल्ह्यातील महसूल आयुक्त राधाकृष्ण‎ गमे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व‎ उच्चशिक्षित सहभागी झाले हाेते.‎ सायंकाळी जोग वारकरी शिक्षण‎ संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज‎ हसेगावकर यांच्या कीर्तनाने धर्म‎ संसदेची सांगता झाली. धर्मसंसद‎ यशस्वी हाेण्यासाठी माऊलीधाम सेवा‎ आश्रमाचे संदीप जाधव यांच्यासह‎ हरिओम सेवा मंडळ, ग्रामस्थ व भजनी‎ मंडळांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...