आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमानी कारभाराने जनता त्रस्त:भारनियमनाविरोधात जाफरनगर उपकेंद्रात नागरिकांचा ठिय्या

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरळीत वीज पुरवठा हाेत नसल्याने संतप्त झालेल्या गुलाब पार्क परिसरातील नागरिकांनी जाफरनगर वीज उपकेंद्र कार्यालयात आंदाेलन केले. मंगळवारी दुपारी तासभर ठिय्या देत संताप व्यक्त केला. आमदार मुफ्ती इस्माईल यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून भारनियमन बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.

शहरात खासगी वीज कंपनीच्या मनमानी कारभारला जनता वैतागली आहे. जाफरनगर वीज उपकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या भागांमध्ये काही दिवसांपासून भारनियमन केले जात आहे. या भारनियमनचा फटका यंत्रमाग व्यवसायिकांना बसत आहे. छोटे, मोठे उद्योग अडचणी सापडले आहेत. कुठलीही पूर्वसूचना न देता भारनियमन होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी उपकेंद्रात जावून अधिकाऱ्यांना जाब विचारला.

अधिकारी व कर्मचारी उडावाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांनी आवारात ठिय्या दिला. हा प्रकार आमदार मुफ्ती यांना समजल्याने ते उपकेंद्रात पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना भारनियमन का केले जात आहे अशी विचारणा केली. भारनियमनाचे आदेश नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचे कारण काय, विनाकारण जनतेला वेठीस धरु नका. फिडर ओव्हरलोड होत असतील तर ती जबाबदारी वीज कंपनीची आहे. वसुलीचे काम तत्पपरतेने होत आहे. तात्काळ भारनियमन बंद करुन सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या सूचना आमदार मुफ्ती यांनी केल्या. यानंतर अधिकाऱ्यांनी अखंडित वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानुसार सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास भविष्यात तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...