आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहनाला प्रतिसाद देत विविध प्रकारची मदत:पूरग्रस्तांना मदतीसाठी सरसावले नागरिक; बजरंग मंडळाकडून गणेशोत्सवातील उपक्रमांना फाटा देत २१ हजार मदत

सिन्नर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिन्नरकरांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्रात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध प्रकारची मदत तालुक्यातील नागरिकांकडून जमा करण्यात येत आहे. झापवाडी येथील बजरंग मंडळ व माजी नगरसेवक पंकज मोरे यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश मदत केंद्रात जमा केला.

माजी नगरसेवक मनोज भगत यांनी धनादेश स्वीकारला. प्रशांत रायते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शहरप्रमुख गौरव घरटे आदी यावेळी उपस्थित होते. मंडळाने उत्सवकाळात विविध उपक्रम हाती घेतले होते. सिन्नरकरांवर संकट आल्याने त्याना मदत करण्याचा निर्णय माजी नगरसेवक मोरे यांनी घेतला. त्यानुसार उत्सव साध्या पद्धतीने करण्याचे ठरवून मदत देण्यात आली.

पाथरे ग्रामस्थांकडून मदतीचा हात
पाथरे ग्रामस्थांकडून एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. गावातील तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून दोन तासांत तब्बल दहा पोती तादूंळ, गहू, बाजरी, साबुन, खोबरेतेल, गोडतेल, बिस्किट, निरमा पावडर, मीठ पिशव्या, साखर आदी जीवनावश्यक वस्तू जमा केल्या. संतोष बारहाते, बाबासाहेब चिने, महेंद्र चिने, सोमनाथ घोलप, मनोज गवळी, दत्तात्रय सगर, डाॅ. सतीश गुंजाळ, हेमतं चिने, रवि पाचोरे, अमोल दंवगे, गौरव चिने आदींनी सहभाग घेतला. ग्रामस्थांनी चिपळूण, कोल्हापूर, सागंली येथे यापूर्वी पूरग्रस्तांना नागरिकांनी मदत पाठवली होती.

बातम्या आणखी आहेत...