आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठेत रस्त्यांवरच पार्किंग:बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्त्यात पार्किंग होणारी वाहने, रस्त्यातच थाटलेली दुकाने यामुळे सिन्नरकरांची पावलोपावली कोंडी होत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने वाहतूक व्यवस्था त्रासदायक ठरू लागली आहे.

ऐन गर्दीच्या वेळी चारचाकी वाहने ठिकठिकाणी अडकून राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा अनुभव पावलोपावली येतो. अशावेळी वाहनधारकांत वादाचे प्रसंग घडत आहेत. असा एकही रस्ता राहिला नाही की जेथे वाहतूक कोंडी होत नाही. ठिकठिकाणी फेरीवाले रस्त्यातच उभे राहतात. रस्त्यातच दुकाने थाटून टाकण्याची शर्यतच शहरात पहावयास मिळते.

कित्येक वाहनधारकांकडे वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे घरासमोर, रस्त्यावर कुठेही वाहने पार्किंग करण्याची सवय नागरिकांना लागली आहे. कित्येक दुचाकीस्वार वाहनावर बसूनच भाजीपाला, फळे खरेदी करतात. एकूणच वाहनधारकांत वाहतुकीची शिस्त राहिलेली नाही.

पोलिसांची नेमणूक करावी
एक महिना सणासुदीचा काळ असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी हाेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होणार आहे. ग्राहक व नागरिक या समस्येमुळे त्रस्त होऊ नयेत याकरिता जागोजागी पोलिसांची नेमणूक करण्याची गरज आहे. बसस्थानक, आडवा फाटा भागात पोलिस निवारा शेड असूनही त्यात पोलिस दिसून येत नाहीत.

वाहतूक समस्या सोडविण्याची मागणी
अंतर्गत वाहतुकीची समस्या तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे, डॉ. दीपककुमार श्रीमाळी यांनी निवेदन दिले.

या मार्गावर वाहतूक कोंडी
सिन्नर व्यापारी बँक ते नाशिक वेस, नाशिक वेस ते आडवा फाटा, नाशिक वेस ते गंगावेस, गंगा वेस ते तळवाडी, गंगावेस ते वीटभट्टी, गणेश पेठ ते वावी वेस, संगमनेरनाका ते बसस्थानक, बसस्थानक ते आडवा फाटा, गावठा ते डुबेर नाका, तानाजी चौक ते गावठा या रस्त्यांवर वाहतुकीची समस्या आहे.

बातम्या आणखी आहेत...