आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:मालेगावला लग्नानंतर वधू व वराच्या गटांत हाणामारी

मालेगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह साेहळा आटाेपल्यानंतर वधूला साेबत नेण्याच्या कारणावरून वर व वधूच्या गटात हाणामारी झाली. यात सहा जण गंभीर जखमी झाल. रमजानपुरा भागात साेमवारी रात्री हाणामारीचा प्रकार घडला. या घटनेनंतर वधू पक्षाने नवऱ्या मुलीस सासरी पाठवण्यास सपशेल नकार दिल्याने वर पक्ष रिकाम्या हातीच परतला. रमजानपुऱ्यातील माेहंमद अय्यूब यांच्या मुलीचा विवाह माेहंमद कादर यांचा मुलगा जमालशी झाला. सामुदायिक विवाह साेहळ्यात हा निकाह संपन्न झाला हाेता. लग्नानंतर जेवण सुरू असताना वराकडील काही जण वधूला घेण्यासाठी आले. वधूच्या वडिलांनी रात्री दहा वाजता मुलीची पाठवणी करणार नसल्याचे सांगितले. यावरून वराच्या मित्रांनी वाद घातला व हाणामारी सुरू झाली.

बातम्या आणखी आहेत...