आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पाणथळ दिनानिमित्त सिन्नर महाविद्यालयाच्या छात्र सेनेच्या वतीने सरदवाडी येथे पुनीत सागर अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी धरण व परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी दाेन क्विंटल प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. एनसीसीच्या छात्रांनी पाणथळ जागांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली. सात महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना, लेफ्टनंट कर्नल रवी व्यास, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. संदीप भिसे यांनी उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. युवकांमध्ये जलस्रोत स्वच्छता, परिसंस्थेची काळजी, पर्यावरणाचे महत्त्व, पृथ्वीच्या स्वच्छतेची जबाबदारी वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमाचा आहे.
एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट संदीप भिसे, ज्युनिअर अंडर ऑफिसर प्रणिता गांजवे, रोशन घुले व छात्रांनी मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्र स्वच्छता, जाणीव जागृती हा संदेश देण्यात आला. ‘प्रदूषण मुक्त जलस्रोत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी'' हा संदेश राष्ट्रीय छात्र सेना या जागतिक पाणथळ दिनानिमित्त देण्यात आला. धरणातील पाण्याच्या कडेला वाहून आलेला कचरा, धरणाची भिंत व परिसरातील प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या यांचे संकलन करण्यात आले. दोन क्विंटलपेक्षा अधिक प्लास्टिक धरणाच्या जलस्रोतामधून संकलित करण्यात आले. जमा केलेला कचरा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाडीत टाकून कचरा डपोत पाठविण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.