आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:भरवीर येथे शिबिरात 30 रक्त पिशव्यांचे संकलन; महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राजपूत युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भरवीर येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने ३० बाटल्या रक्त संकलित झाले. सकाळी ९ वाजता महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे विजय जाधव, सोसायटी संचालक गोरख ढगे, योगेश ढोमसे, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव उपस्थित होते. विजय जाधव यांनी मनोगत व्यत केले.

यानिमित्त राजपूत युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी योगेश जाधव, बाळू जाधव, अनिकेत गायकवाड, कैलास जाधव, योगेश गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली ३० तरुणांनी रक्तदान करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला. भविष्यात कोरोनासारख्या संकटांना तोंड देण्यासाठीं रक्तदानाचा संदेश तरुणांनी एकत्र येत दिला.

मालेगाव येथील रतपेढीच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले. शिबिरासाठी कैलास जाधव, दिलीप जाधव, योगेश जाधव, अनिकेत गायकवाड, योगेश गांगुर्डे, बाळू जाधव, गोरख गायकवाड, ऋषिकेश बोराडे, आशुतोष शिंदे, राहुल जाधव, राहुल गायकवाड, अमोल गायकवाड, शुभम जाधव आदींनी परिश्रम घेतले. सायंकाळी मिरवणूक काढून महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...