आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकलन:रक्तदान शिबिरात 53 बाटल्यांचे संकलन

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या अनकाई येथील प. पू. गुरुदेव हसमुख मुनीजी महाराज यांच्या ७९ व्या जयंती दिनानिमित्त आराधना उद्यान केंद्रात झालेल्या रक्तदान शिबिरात ५३ दात्यांनी रक्तदान केले. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. रक्तदान शिबिराचे उद‌्घाटन साहित्यिक संदीप देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुंबई येथील दिनेश पारेख होते. सूत्रसंचालन कल्पेश देसाई यांनी केले. परिचय शतकवीर रक्तदाते प्रदीप गुजराथी यांनी करून दिला. देशपांडे म्हणाले की, मन शांत ठेवायचं असेल, जीवनात आनंदी व्हायचं असेल तर माणूस जोडणं महत्वाचं आहे.

या दुनियेत जीव घेणारे खूप आहेत पण जीव देणारे, जीवदान देणारे माणसं म्हणजे येथे रक्तदानासाठी उपस्थित असलेले नागरिक आहेत. ४० वर्षांत सातत्याने, अखंडपणे एकाच दिवशी, एकाच ठिकाणी शिबिर भरवणे हा महाराष्ट्रात विक्रम असेल, असे देशपांडे यांनी सांगितले. अध्यक्ष दिनेश पारेख म्हणाले की, प. पू. हसमुख मुनीजी म.सा. यांनी निष्काम कर्मयोग शिकविला. प्रवृत्ती, निवृती आणि विरक्ती यांचा संगम म्हणजे जीवन होय. दुसऱ्यांसाठी जगणं अधिक सुंदर असतं. नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीतर्फे यावेळी ५३ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. पोपट बेदमुथा, सुनील बागरेचा यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...