आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:देवळा महाविद्यालयाच्या एनसीसीतर्फे कोलती नदीतील प्लॅस्टिक कचरा जमा; राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने कोलती नदी परिसरात ‘पुनित सागर’ अभियान राबविण्यात आले

देवळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने कोलती नदी परिसरात ‘पुनित सागर’ अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी नदीपात्रातील व नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील प्लॅस्टिक कचरा गोळा केला.

अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर उपस्थित हाेते. प्रास्ताविकात लेफ्टनंट बादल लाड यांनी पुनित सागर अभियानाविषयी माहिती दिली. भारत सरकार व एनसीसी निदेशालय यांच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत अाहे. या अभियानात समुद्र, नदी, तलाव, धरणे, पाण्याचे असलेले जलस्रोत या ठिकाणी स्वच्छता मोहीम व प्लॅस्टिक गोळा करणे अशाप्रकारचे राष्ट्रव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अलोककुमार सिंग व प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार हा कार्यक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील जलसाठे व नदी, धरणे, तलाव व जलसाठे परिसर प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहभागी झालेल्या छात्रांनी देवळा शहरात प्रभातफेरी काढून प्लॅस्टिकचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा यांसारख्या घोषणा देत आपल्या जलसाठ्याच्या संवर्धनाविषयी जनजागृती केली. यावेळी प्रा. डॉ. मालती आहेर यांनी प्लॅस्टिक वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकमुळे होणारी हानी, अनेक समस्या व प्रदूषण याविषयी माहिती दिली व उपप्राचार्य विजयकुमार जोशी यांनी जलसंवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. भारतामध्ये व संपूर्ण जगामध्ये जलसंवर्धन व वृक्षलागवड हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे व त्यासाठी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेऊन पुढील कामाला लागले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. मालती आहेर व उपप्राचार्य विजयकुमार जोशी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...