आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम:जिल्ह्यात सामूहिक राष्ट्रगीत गायन

मनमाड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी शहरात सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, संघटना, शाळा आणि महाविद्यालयात पार पडला.

नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आदींनी व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, शहरांतील विविध शाळा, महाविद्यालयात सामूहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम झाला.शहरांतील सर्व शासकीय कार्यालये, उपजिल्हा रुग्णालय, खासगी आस्थापनांमध्ये सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे सराफ बाजारात सामूहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...