आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागीता जयंतीनिमित्त सोनांबे येथील जनता विद्यालयात भगवद्गीतेचे पूजन करून आध्यात्मिक नवोपक्रम राबविण्यात आला. इयत्ता सहावीच्या १८ विद्यार्थ्यांनी गीतेतील १८ अध्यायांचे विवेचन सादर केले. मुख्याध्यापक वसंत शिंदे, पर्यवेक्षक प्रभाकर फटांगळे, ज्येष्ठ शिक्षका मंगल हांडे, प्रभाकर चतूर, दीपक पगारे, पंडित चिने, मिलिंद पाटील, नवनाथ माळी, सुनील खैरनार, वर्षा सोनवणे, भारती धाकतोडे, ज्योती पाटील, रूपावली काळे, रूपाली महाले, मीना केदार, शबाना कादरी, सोनाली पाटील, दीपाली घोटेकर, संवेदिता जाधव, तात्यासाहेब बोरसे, भाऊसाहेब दहिफळे, सुहास जुन्नरे आदी उपस्थित होते.
“केल्याशिवाय मिळत नाही. केलेले फुकट जात नाही. काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे. काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे” हा गीता सार संपूर्ण विश्वाला देणारी गीता व त्या भगवद्गीतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी विद्यालयात इयत्ता सहावी (ब)च्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका योगिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक नवोपक्रम राबवला.
मुख्याध्यापक वसंत शिंदे, प्रभाकर फटांगळे यांच्या हस्ते गीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले. कोमल राव, यशराज पवार, कल्याणी काळुंगे, प्रणाली आव्हाड, प्राजक्ता सदगीर, अनुष्का खताळे, श्रावणी पवार, नयन पवार, महिषा खान, राम शिंदे, गौरी पवार, कृष्णा मुंडे, सिद्धी शिंदे, रुद्र पवार, प्रेरणा शेळके, कृष्णा शिंदे, अर्चित पवार, राणी शिंदे आदी विद्यार्थ्यांनी गीता अध्यायाचे सार मांडले. यावेळी योगिता शिंदे, संदीप पडवळ, दीपक भालेराव यांनी गीता ही मानवाच्या कल्याणासाठी उपयुक्त असल्याचे दाखले दिले. प्रणिता पवार हिने सूत्रसंचालन केलेईश्वरी शिंदे हिने आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.