आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:वाणिज्य आणि विज्ञान ; पिंपळगाव महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 99.73%

पिंपळगाव बसवंत20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील क. का. वाघ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान विभागाचा ९९.७३टक्के,वाणिज्य विभागाचा ९६.५३ टक्के, कला विभागाचा ६६.६६ टक्के तर एच.एस्सी. व्होकेशनल विभागाचा निकाल ६३.५५ टक्के लागला. क. का. वाघ महाविद्यालयातील विज्ञान विभागाचा निकाल ९९.७३ टक्के लागला. या शाखेत राजश्री संजय साळुंखे ही विद्यार्थिनी ८८.५० टक्के मिळवून प्रथम, ललित ज्ञानेश्वर उशीर ८६.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय, अंकिता ज्ञानेश्वर आवारे ८५.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आली.

तसेच वाणिज्य विभागाचा निकाल ९६.५३ टक्के लागला. या शाखेमध्ये दीक्षा मनोज अग्रवाल ही विद्यार्थिनी ९०.८३ टक्के मिळवून प्रथम, प्रियांका समाधान पुरकर ८८.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय, प्रीती पांडुरंग भोसले ८७.३३ टक्के गुण मिळवून तृतीय तर कला विभागाचा निकाल ६६.६६ टक्के लागला. या शाखेमध्ये कु. साळुंके अर्जुन दगडू साळुंके हा विद्यार्थी ७६.८३ टक्के गुण मिळवून प्रथम आला तर एच. एस्सी. व्होकेशनल विभागाचा निकाल ६३.५५ टक्के लागला. या शाखेमध्ये कु. वेदिका पुंजाराम निरगुडे ही विद्यार्थिनी ७०.८३% मिळवून प्रथम आली.

बातम्या आणखी आहेत...