आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर परिसरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील ३३ मुस्लिम वधू व वरांचा रविवारी दुपारी सामुदायिक विवाह साेहळा पार पडला. मालेगाव अहेलेकार साेसायटीने विना शुल्क विवाहांचा खर्च उचलून नवदांपत्यांना विविध ६० संसाराेपयाेगी वस्तुंची भेट दिली. माैलाना उमरैन महेफूज रहेमानी यांनी विवाह लावून दांपत्यांना शुभेच्छा दिल्या. आर्थिक विवंचनेमुळे अनेक कुटुंबियांना आपल्या मुला - मुलींचे विवाह जुळविण्यात अडचणी येतात. या अडचणी लक्षात घेता मालेगाव अहेलेकार साेसायटीने उपवर वधू व वरांचा शाेध घेत गुरबैद मशिदीजवळील गेंदा मैदानावर सामुदायिक विवाह साेहळ्याचे आयाेजन केले हाेते. याप्रसंगी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डचे सचिव माैलाना उमरैन महेफूज रहेमानी यांनी मार्गदर्शन केले.
विवाहांमध्ये हाेणारा अनावश्यक खर्च टाळून अगदी साधारण पद्धतीने लग्न लावावे, असे आवाहन केले. समाजात व घरात वागताना आपले वर्तन चांगलेच ठेवा. कुटुंब ही आपली जबाबदारी आहे. पती व पत्नी यांनी आपले अधिकार व हक्क ओळखले तर काैटुंबिक वाद कधीही हाेणार नाही, असा सल्ला दिला. विवाहाचे महत्त्व, वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या आदींविषयी त्यांनी धार्मिकदृष्ट्या महत्त्व विशद केले. याप्रसंगी डाॅ. अब्दुल माजीद, इलहाज अब्दूल अजीज मुकादम, नुरानी दर्गाही, कारी मुख्तार हसन रफाेग अन्सारी, अतिक अहमद सिद्दीकी अादी उपस्थित हाेते.
१५ वर्षांत ३०० विवाह
अहेलेकार साेसायटी मागील १५ वर्षांपासून सामुहिक विवाह साेहळ्याचे आयाेजन करत आहे. दरवर्षी साधारण २५ जाेडप्यांचा विवाह लावला जाताे. आत्तापर्यंत ३०० दाम्पत्य विवाहबद्ध हाेवून आपला संसार सुखाने करत आहे. लग्नातील व्यर्थ खर्चाला आळा बसावा, साध्या पद्धतीने विवाह व्हावेत या हेतूने सामुदायिक विवाह साेहळे अायाेजित करत असल्याची साेसायटीचे सचिव कारी मुख्तार फराेग अन्सारी यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.