आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी:विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

येवला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी असून त्या सोडविण्यासाठी मनसे विद्यार्थी सेना पुढाकार घेणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, नोकर भरती मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांनी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी महासंपर्क अभियानांतर्गत येवल्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुरुवातीला अमित ठाकरे यांचे येवल्यातील विंचूर चौफुलीवर ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

यानंतर विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश पटेल व डॉ. संगीता पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. स्कूलमध्ये त्यांच्या हस्ते फुटबॉल टर्फचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी फुटबॉल खेळण्याचाही आनंद लुटला. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, शहराध्यक्ष गौरव कांबळे, जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, शहर संघटक शैलेश करपे, तालुकाध्यक्ष नकुल घागरे, विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महेश लासुरे, चेतन फुलारी, माणिक पवार, प्रवीण खैरनार, महेश भातकुटे, अक्षय पंढोरे, सदाशिव चव्हाण, सागर खोडके, नीलेश सातळकर, नितीन शिंदे, समाधान सोमासे, भाऊसाहेब शेटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीप्रसंगी पत्रकारांना दूर ठेवले.

बातम्या आणखी आहेत...