आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:मतदारसंघातील सुरू विकास‎ कामे तातडीने पूर्ण करा‎

येवला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मतदारसंघात सुरू असलेली‎ विकासाची सर्व कामे लवकरात‎ लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशा‎ सूचना करतानाच विकासकामांमध्ये‎ दप्तर दिरंगाई सहन केली जाणार नाही,‎ असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन‎ भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना‎ दिला.‎ भुजबळ यांनी रविवारी (दि. ५)‎ येथील संपर्क कार्यालयात कांदा‎ खरेदी बाबत सविस्तर चर्चा करून‎ कांदा खरेदीचा आढावा घेतला. तसेच‎ मतदरसंघांतील रस्ते, महावितरणची‎ कामे, पाणी टंचाई, जलसंधारण,‎ पाणी पुरवठा योजना, रोजगार हमी,‎ जलयुक्त शिवार, सहकार, कृषी‎ विभागाच्या योजनांसह मतदार संघात‎ सुरू असलेल्या विविध‎ विकासकामांचा आढावा घेतला.‎ भुजबळ म्हणाले की, मतदारसंघात‎ विजेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी‎ लावण्यासाठी नव्याने विद्युत उपकेंद्र‎ मंजूर करण्यात आले आहे. त्या‎ उपकेंद्राचे कामे तातडीने सुरू करावे,‎ शेतकऱ्यांचे बंद ट्रान्सफार्मर लवकर‎ दुरुस्त करावीत.

टंचाईचे प्रस्ताव सादर‎ करून टंचाईग्रस्त गावातील‎ नागरिकांना पाण्याची कमतरता पडू‎ देऊ नये, सार्वजनिक बांधकाम‎ विभागासह विविध योजनांतून सुरू‎ असलेली रस्त्यांची कामे, जलसिंचन,‎ पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने‎ पूर्ण करावीत, येवला शहरात स्वच्छता‎ व सुशोभीकरणाची कामे करण्यात‎ यावी अशा सूचना त्यांनी केल्या.‎ येवला आगारातील राहिलेली कामे,‎ नवीन विकासकामांचे प्रस्ताव सादर‎ करण्यात यावेत, नाफेड कांदा खरेदी,‎ कांद्याची होणारी आवक व शिल्लक‎ कांदा आणि येणाऱ्या अडचणींबाबत‎ त्यांनी चर्चा केली.‎ यावेळी तहसीलदार प्रमोद हिले,‎ गटविकास अधिकारी अन्सार शेख,‎ नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र‎ मुतकेकर, सार्वजनिक बांधकाम‎ विभागाचे सहायक कार्यकारी‎ अभियंता सागर चौधरी, उपअभियंता‎ अभिजित शेलार, गणेश चौधरी,‎ जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम‎ विभागाचे उपअभियंता पी. एम.‎ कुलकर्णी, शाखा अभियंता राहुल‎ भामरे, शहर अभियंता जनार्दन‎ फुलारी, पाटबंधारे विभागाचे अमोल‎ सुरडकर, अनिता सखदे,‎ महावितरणचे अभियंता संदीप‎ अस्वले, मिलिंद जाधव, येवला‎ आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे,‎ वाहतूक निरीक्षक विकास वाहूल,‎ फलोत्पादन अधिकारी हितेंद्र पगार,‎ सहायक पोलिस निरीक्षक भिसे, वसंत‎ पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, पांडुरंग‎ राऊत, संतोष खैरनार, मकरंद‎ सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, सुनील‎ पैठणकर आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...