आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज

नाशिकरोड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरात मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यामधील काही मंडळे हे अनधिकृत वीजजोडणी करतात, त्यामुळे महावितरणला याचा आर्थिक फटका बसत असल्याने महावितरणने उत्सव मंडळांनी सवलतीच्या दरात तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन केले आहे. नवरात्र उत्सव साेमवारी (दि. २६) सुरू हाेत आहे.

महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ ४.७१ रुकये प्रतियुनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८.६९ रुपये प्रति युनिट, ३०१ ते ५०० प्रतियुनिट वीज वापरासाठी ११.७२ रुपये आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरासाठी १३.२१ रुपये दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. अनधिकृत विजेचा वापर केल्यास मंडळावर भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.