आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:थकीत भूसंपादन रकमेसाठी प्रांतांधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूसंपादनाच्या वाढीव थकीत रकमेसाठी न्यायालयाच्या आदेशाने प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची खुर्ची जप्त करण्यात आली. गुरुवारी दुपारी बिलिप कर्मचाऱ्यांची खुर्ची जप्तीची कारवाई केली.तालुक्यातील दहिवाळ येथे काही शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावासाठी भूसंपादित झाली आहे. रोजगार हमी योजनेतून तलावाचे काम झाले होते. जमिनीच्या वाढीव नऊ लाख ५६ हजार रुपये मोबदल्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.

न्यायालयाने सुनावणीत थकीत रकमेचा तातडीने धनादेश द्यावा किंवा खुर्ची जप्त करावी असे आदेशित केले हाेते. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी प्रांत शर्मा यांनी चर्चा केली. रकमेची मागणी शासनाकडे केली आहे. या प्रक्रियेस वेळ लागणार असल्याने किमान तीन महिने अवधी देण्याची विनंती प्रांत शर्मा यांनी केली. मात्र, बिलिप कर्मचाऱ्यांनी प्रांतांची खुर्ची जप्त केली. खुर्ची जप्ती कारवाईमुळे महसूल विभागावर नामुष्की ओढावली आहे. यासंदर्भात प्रांत शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खुर्ची जप्ती कारवाई झाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...