आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मालेगावी मोकाट जनावरांची जप्ती व मालकांवर होणार दंडात्मक कारवाई

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका कार्यक्षेत्रात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळे येत आहे. जनावरे मालकांनी ती गोठ्यात बांधून ठेवावीत. अन्यथा त्यांची जप्ती करून मालकांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

पालिका क्षेत्रात पाळीव जनावरांसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र काही दिवसांपासून चौकात, भाजी बाजारात, हमरस्त्यावर व इतर ठिकाणी मोकाट जनावरे उभे रहात आहे. ही जनावरे लहान मुले, महिला व इतर नागरिकांना मारतात. नागरिकांना रहदारीत अडथळा निर्माण करत आहेत. पालिकेच्या कारवाईत जनावरे आढळून आल्यास ती जप्त केली जातील व मालकांवर दंडात्मक कारवाई होईल. मोकाट जनावरे परत मिळण्यासाठी अर्जासोबत रेशनकार्ड, आधारकार्ड व १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र आणावे. दाेन हजार रुपये दंड भरल्यानंतर प्रति जनावरापोटी दैनंदिन ३५० रुपये खावटीपोटी भरल्यावर मूळ मालकाकडे जनावरे हस्तांंतरित करण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...