आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे निर्बंध:मनमाडला बाजारपेठेत गर्दी ; उत्साहाचे व चैतन्याचे दिसले वातावरण

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. निर्बंधमुक्त वातावरणात बाजारपेठेत असलेले उत्साहाचे वातावरण, अर्थचक्राला गेल्या काही महिन्यांत मिळालेली गती या एकूणच पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे अनेकांनी नवीन वस्तू खरेदीकडे पाठ फिरविली होती. परंतु यंदा निर्बंधही शिथिल झालेले आहे. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट, वाहन, सराफी बाजारपेठ पुन्हा सज्ज झाली आहे. सायंकाळीही सर्वच मुख्य बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलली होती. नवरात्राेत्सव सुरू झाल्यापासून बाजारात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढला असल्याचे सांगण्यात आले. दुर्गाष्टमी व नवमीनिमित्त घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळात भरगच्च कार्यक्रम साजरे झाले. होमहवन, फुलोरा, जोगवा आदी कार्यक्रमांची नवरात्राेत्सवाची रंगत अंतिम टप्प्यात वाढली. गोदावरी देवी मंदिर, सप्तशंृगी माता मंदिर, तुळजाभवानी माता मंदिर, लक्ष्मीमाता, शितला माता आदी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात मूर्ती स्थापना केली आहे.

बातम्या आणखी आहेत...