आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणाबाजी:ईडी कारवाईचा निषेध करत कॉंग्रेसची मालेगावात निदर्शने व

मालेगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉग्रेस नेते राहूल गांधी यांची चार दिवसांपासून ईडीमार्फत चौकशी सुरु आहे. चौकशीत ईडीच्या हाती काहीही लागलेले नाही. दबाव टाकण्यासाठी केंद्र सरकारचा ईडीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करुन कॉग्रेसने शुक्रवारी दुपारी जोरदार निदर्शने केली.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन केले जाणार होते.

बेग हे कार्यकर्त्यांसह कॉग्रेस भवनपासून पायी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अडविले. पुढे जाण्यास विरोध केल्याने कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. कॉग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राहूल गांधी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. चार दिवसाच्या चाैकशीत कुठलेही पुरावे ईडीला मिळालेले नाही.

नॅशनल हेरोल्ड प्रकरणाची केस सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये बंद केली आहे. केवळ राजकीय आकसापोटी गांधी कुटूंबियांना त्रास देण्याचा उद्योग भाजप सरकार करत असल्याचा आरोप बेग यांनी केला. भाजपने ईडीचा गैरवापर थांबवावा अन्यथा देशभरात काॉग्रेसच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलने छेडली जातील, असा इशारा बेग यांनी दिला. आंदाेलनात कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...