आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपळगावमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सहा प्रभागांच्या रचनेचा प्रारूप आराखडा व आरक्षण जाहीर केले होते. निवडणुकीबाबतच्या आरक्षण सोडतीबाबत हरकत नोंदविण्यात आल्यानंतर प्रभाग क्रमांक २, ४ व ६ या तीन प्रभागांच्या आरक्षणात नागरिकांच्या उपस्थितीत बदल जाहीर करण्यात आला. त्यामुळे या प्रभागातून इच्छूक असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कालावधी हा डिसेंबरमध्ये पूर्ण होत असल्याने आगामी निवडणुकीसाठी शहरातील सहा प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर केली हाेती. या आरक्षण सोडतीमध्ये काही उपस्थित नागरिकांनी आक्षेप नोंदविल्याने त्याची हरकतीची नोंद करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक २, प्रभाग क्रमांक ४ व प्रभाग क्रमांक ६ च्या आरक्षणात बदल करण्यात आला.
यावेळी मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव, अभिजित पाटील, उपसरपंच नीलेश कडाळे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, सुहास मोरे, अल्पेश पारख, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नीलेश पाटील, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, दीपक बनकर, बापूसाहेब पाटील, दीपक मोरे, अॅड. गीतेश बनकर, सदस्य सत्यभामा बनकर, नंदू गांगुर्डे, सत्यजित मोरे, बाळा बनकर, केशव बनकर, हर्षल जाधव, राजा गांगुर्डे, आशा सेविका आदींसह नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १ : क्षेत्र - आग्रा रोड पश्चिम बाजूने कादवा नदी पुलाचा कोपरा ते नदीची उत्तर बाजूपासून ते उंबरखेड शिव ते पालखेड कालव्याची दक्षिण बाजूने चिंचखेड चौफुलीपर्यंत, चिंचखेड रस्त्याची दक्षिण ते महामार्गाच्या पश्चिम बाजूने कादवा पुलाचा कोपऱ्यापर्यंतचा संपूर्ण क्षेत्र
लोकसंख्या- ७९४४
आरक्षण- १)अनुसूचित जमाती, २) सर्वसाधारण ३) सर्वसाधारण स्त्री.
प्रभाग क्रमांक २ : क्षेत्र- चिंचखेड चौफुलीपासून चिंचखेड रोडच्या उत्तर बाजूच्या नालापर्यंत, पालखेड कालव्याच्या उत्तर बाजू उंबरखेडच्या शिवपर्यंतच्या पश्चिम शिवेने वणी रोडच्या दक्षिण बाजूने वणी चौफुलीपर्यंत
लोकसंख्या- ७१३७, आरक्षण- १) सर्वसाधारण, २) सर्वसाधारण ३) सर्वसाधारण स्त्री. प्रभाग क्रमांक ३ : क्षेत्र- चिंचखेड शिवेपासून वणी रोडची उत्तर बाजूने वणी चौफुली व तेथून राष्ट्रीय महामार्गची उत्तर बाजूने पिंपळगाव ते पाचोरा वणी शिवपर्यंत
लोकसंख्या- ५२५९
आरक्षण- १) सर्वसाधारण, २)अनुसूचित जमाती स्त्री.
प्रभाग क्रमांक ४ : क्षेत्र- वणी चौफुलीपासून महामार्गाची दक्षिण बाजूने पाचोरा वणी आहेरगाव शिवपर्यंत, वणी चौफुली जुन्या आग्रा रोडची पूर्वेकडील बाजूने ते मनाडी नालापर्यंत, मनाडी नालाची उत्तर बाजूने नदीपर्यंत व नदीच्या पूर्वेकडील निफाड रोडची उत्तर बाजूने आहेरगाव - लोणवडी शिवपर्यंत
लोकसंख्या - ७१७४
आरक्षण - १) अनुसूचित जमाती, २) अनुसूचित जाती ३) सर्वसाधारण स्त्री.
प्रभाग क्रमांक ५ : क्षेत्र- निफाड चौफुली ते जुना रोडची पूर्वेकडील बाजूने नालापर्यंत व मनाडी नाल्याची दक्षिण बाजूने नदीपर्यंत व नदीच्या पूर्वेकडे निफाड रोडची दक्षिण बाजूने लोणवडी - बेहेड शिव ते कादवा नदीच्या पुलापर्यंत व तेथून महामार्गाची पूर्व बाजूने जुना आग्रा रोडची पूर्व बाजूने मनाडी नाल्यापर्यंत
लोकसंख्या - ७३३१
आरक्षण- १) सर्वसाधारण, २) अनुसूचित जाती स्त्री, ३) सर्वसाधारण स्त्री.
प्रभाग क्रमांक ६ : क्षेत्र- एस. टी. डेपोसमोरील नवीन व जुना आग्रारोडच्या कोपऱ्यापासून नवीन आग्ररोडची पूर्वेकडील हद्दीने वणी चौफुलीपर्यंत व वणी चौफुलीपासून जुना आग्रारोडच्या पश्चिमेकडील बाजूने एस. टी. डेपोसमोरील नवीन- जुना आग्रा रोडच्या कोपऱ्यापर्यंत
लोकसंख्या - ६७१४
आरक्षण- १) सर्वसाधारण, २) अनुसूचित जाती स्त्री, ३) सर्वसाधारण स्त्री.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.