आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम अपूर्णच:होमपाड्यातील अंगणवाडीचे बांधकाम 4 वर्षांपासून अपूर्णच; त्यामुळे येथील चिमुकल्यांना छोट्याशा समाजमंदिरात शैक्षणिक धडे गिरवावे लागत आहेत

हरसूल13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या पेठ तालुक्यातील नाचलोंढीतील होमपाडा येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम चार वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे येथील चिमुकल्यांना छोट्याशा समाजमंदिरात शैक्षणिक धडे गिरवावे लागत आहेत.

चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने येथे अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी कंत्राट दिले होते, मात्र ठेकेदाराने अंगणवाडीच्या इमारतीचे काम अर्धवट केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.

त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व बांधकाम विभागाने याबाबत पाठपुरावा करून अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना इमारत बांधून द्यावी, अशी मागणी नाचलोंढी येथील भगवान बोरसे, मधुकर साबळे, सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, जयराम लहारे, श्याम गावित, पांडुरंग महाले, शंकर चौधरी, लक्ष्मण माळी, मधुकर महाले या नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...