आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४२ शाळांच्या वर्गखोल्यांचा दुरुस्तीसाठी तर १२ शाळांमध्ये नवीन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी एकूण चार कोटी १७ लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. लवकरच या शाळेच्या दुरुस्ती व बांधकामास सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दुरुस्ती व नवीन इमारतीसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार जिल्हा नियोजनांतर्गत ४२ शाळांच्या वर्गखोल्यांचा दुरुस्तीसाठी तर १२ शाळांमध्ये नवीन इमारत बांधकामासाठी प्रशाकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी एकूण चार कोटी १७ लाख रुपये निधीस मंजूर करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील सावरगाव, धामोडे येथील प्राथमिक शाळेसाठी १० लाख रुपये निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. अनकुटे, सायखेडे, कुसूर म्हसोबा वस्ती, घनमाळी वस्ती नगरसूल, पारेगाव, अंदरसूल मन्यारथडी, पिंपळगाव जलाल, नगरसूल सोनवणे वस्ती, जायदरे, चिखलेवाडी.
१२ शाळांना मिळणार नवीन इमारत जिल्हा नियोजन निधी अंतर्गत १२ प्राथमिक शाळांच्या इमारतीच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. यामध्ये निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक, येवला तालुक्यातील पाटोदा उर्दू व बल्हेगाव, देवदरी, वाघाळे, खरवंडी, अंगुलगाव, भारम, पुरणगाव, देवठाण, मुखेड, नांदूर या नवीन शाळा इमारतीसाठी प्रत्येकी ९.६० लाखाचा निधी मंजूर केला आहे. याप्रमाणे एकूण १२ शाळा खोल्यांसाठी एक कोटी ९२ लाख निधी मंजूर केला आहे
१२ अंगणवाडींच्या इमारतींसाठी १.३५ काेटी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघातील १२ गावांत अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेंंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. लवकरच या इमारतीच्या कामांना सुरुवात होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.