आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिका हद्दीत स्वच्छता, दूषित पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने महात्मा गांधी पुतळा येथे धरणे धरण्यात आले. आयुक्त भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले.
मालेगाव महानगरपालिका अस्तित्वात येऊन २१ वर्षे झाली, परंतु नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मालेगाव शहरात अस्वच्छता पसरली आहे, औषध फवारणी वेळेवर केली जात नाही त्यामुळे मलेरिया, चिकुनगुन्या डेंग्यूची साथ सुरू आहे. शहरातील जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. गटारीचे पाणी त्यात जाऊन दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे डायरियासारखी साथ सुरू आहे. पालिका प्रशासनाच्या दवाखान्यात चांगल्या सुविधा उपलब्ध नाही.
त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आर्थिक व मानसिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चांगले रस्ते खोदून भूमिगत गटार निर्मिती करण्यात येत असून ती मुरुम फिलिंग करून न बुजवता साधी माती टाकून बुजवली जात आहेत, पाऊस पडला की येथे पायी चालणे शक्य होत नाही, वाहने स्लीप होतात त्यातून अपघात घडत आहेत पावसाळ्या आदी हे काम पूर्ण करून रस्ते सुस्थितीत करण्याची गरज होती पण तसे मनपा प्रशासनाने केले नाही. मुख्य रस्ते पहिल्याच पावसात उखडले आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, अपघात वाढले आहेत याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.
आंदाेलनात निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, रामदास बोरसे, शेखर पगार, जितेंद्र दिसले, विवेक वारुळे, भरत पाटील, कैलास तिसगे, प्रा. अनिल निकम, यशवंत खैरनार, श्याम कासार, मोहम्मद यासिन, अशपाक अहमद, दीपक पाटील, कल्पना शेवाळे, संजय महाले, गोपाळ सोनवणे, प्रीतेश शर्मा, अतुल लोढा, रामलिंग त्रिमुखे, गनी शाह, प्रदीप पहाडे, मोहन कांबळे, अजय दरेकर, भाग्येश कासार, विठोबा द्यानद्यान आदी सहभागी झाले होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.