आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन इमारतींचा शुभारंभही:पाेलिस वसाहतींच्या 205 खाेल्यांचे लाेकार्पण

मालेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कॅम्प भागात उभारण्यात आलेल्या पाेलिस वसाहतींच्या २०५ खाेल्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी लाेकार्पण करण्यात आले. शिंदे यांनी काही कर्मचाऱ्यांना प्रतीकात्मक चावी देत गृहप्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या. या दरम्यान कॅम्प पाेलिस उपअधीक्षक कार्यालय व कॅम्प पाेलिस ठाण्याच्या नूतन इमारतींचा शुभारंभही झाला.

येणाऱ्या काळात राज्यभरातील पाेलिसांसाठी घरकुलांचा प्रकल्प राबविला जाणार आहे. नवीन पाेलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. माजी मंत्री भुसे यांनी पाेलिस वसाहत उभारणीची माहिती दिली. ५४ काेटी ४९ लाखांंच्या निधीतून वसाहती उभ्या राहिल्या आहेत. अजूनही काही कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी केली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन काेनशिलेचे अनावरणही करण्यात आले. कार्यक्रमास आमदार मुफ्ती माेहम्मद इस्माईल, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र राज्य पाेलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना त्यागी, पाेलिस महानिरीक्षक डाॅ. बी. जी. शेखर- पाटील, पाेलिस अधीक्षक सचिन पाटील, नाशिकचे आयुक्त जयंत नाईकनवरे, अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...