आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी सुरू:सोनोग्राफी मशीनसह वैद्यकीय अधिकाऱ्याची वादग्रस्त प्रॅक्टिस ‘स्कॅन’

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळालीगाव येथे बालाजी हॉस्पिटलमध्ये अनधिकृत सोनोग्राफी मशीन आढळले असून धक्कादायक बाब म्हणजे हे हॉस्पिटल महापालिकेचे माजी वैद्यकीय अधीक्षक तसेच आत्ताचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांचे असल्याचे आढळले आहे. पालिका सेवेत असताना खासगी प्रॅक्टिस करण्यास बंदी असताना या ठिकाणी भंडारी यांचा फलक लागल्यामुळे आता महापालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेत सविस्तर चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात सोमवारी (२१) अहवाल आयुक्त डॉ. चंद्रकांत

डॉ. भंडारी यांच्या पत्नीकडून श्री बालाजी हॉस्पिटलचा वापर डॉ. भंडारी यांच्या पत्नी सुनीता या देखील वैद्यकीय अधिकारी असून त्यांनी पालिकेमध्ये नव्याने वैद्यकीय नोंदणीसाठी अर्ज केला हाेता. मात्र त्यास परवानगी मिळाली नसतानाही प्रॅक्टिस सुरू होती. डॉ. नागरगोजे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. या आठ ते दहा बेडच्या हॉस्पिटलमध्ये ४ रुग्ण उपचार घेत असल्याचे आढळले. दरम्यान या ठिकाणी पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. भंडारी यांचा देखील प्रॅक्टिसचा बोर्ड आढळल्याने आयुक्तांकडे अहवाल पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

मी तिथे प्रॅक्टिस करत नाही; मी त्या रुग्णालयाचा मालक आहे पालिका सेवेत येण्यापूर्वी हे रुग्णालय मी घेतले असून सेवेत आल्यानंतर ते खासगी संस्थेला चालवण्यासाठी दिले. मालक म्हणून माझा या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे. सोनोग्राफी मशीन हे मी ज्यावेळेस रुग्णालय घेतले, तेव्हापासून असून २००६ मध्येच बंद केल्याची माहिती पालिकेला कळवली आहे. -डॉ. राजेंद्र भंडारी, वैद्यकीय अधिकारी, पालिका

आढळल्या अनेक गंभीर बाबी, आयुक्तांना अहवाल देणार अनधिकृत सोनोग्राफी मशीनचा वापर तसेच पालिका सेवेत असताना वैद्यकीय व्यवसाय अशा तक्रारी आल्यामुळे त्याची शहानिशा करून सोमवारी आयुक्तांकडे अहवाल पाठवणार आहे. - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक. महापालिका

बातम्या आणखी आहेत...