आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक:बल्हेगाव येथे शिवराज्याभिषेक; बल्हेगावी लोककल्याण कार्यावर प्रकाश

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बल्हेगाव येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भगवा ध्वज उभारला गेला. त्यानंतर ग्रामसेविका सुजाता मोरे यांनी रांगोळी रेखाटली. यावेळी सरपंच सुशीला कापसे, उपसरपंच जालिंदर कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य शंकर निकाळे आदींसह ग्रामस्थांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

शिवाजी महाराज यांच्या विविध लोककल्याणकारी कार्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी अंगणवाडी कर्मचारी विजया जगताप, सुभाष जमधडे, समाधान सोमासे, मनोज पिंगळे, नितीन संसारे, ग्रामपंचायत कर्मचारी गंगाधर मोरे, भाऊ माळी, दत्तात्रय गरुड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’,’शिवराज्याभिषेक दिन चिरायु होवो’ आदी घोषणा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...