आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्म:जोडप्यास नाशिक येथे जाण्याचा सल्ला दिला;' घोटीत महिलेने दिला पाच किलोच्या बालकास जन्म

घोटी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एका खासगी रुग्णालयात महिलेने पाच किलो वजन असलेल्या बाळाला जन्म दिला. आईला रक्तदाबाचा त्रास असताना व गर्भनाळ बाळाच्या मानेभोवती गुंडाळली गेली असल्याने अनेक डॉक्टरांनी या जोडप्यास नाशिक येथे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ रमेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करत आई व बाळाला सुरक्षित केले. कर्नाटक येथील नागलक्ष्मी आतलुरी (३२) हिने ५.२ किलोच्या बाळाला जन्म दिला. महिला आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या पथकात भूलतज्ज्ञ डॉ. अभिनंदन सोनी, स्त्रीरोगतज्ज्ञ ज्ञानेश्वर शिरसाठ, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील बुळे यांनी अथक परिश्रम घेतले. सदर महिला व बालकावर डॉ. बुळे हे लक्ष ठेवून आहे. परप्रांतीय जोडपे हे एका खासगी कंपनीत नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे समजल्याने डॉ. सातपुते यांनी ही जोखीम पत्करत त्यांना मदत केली.

बातम्या आणखी आहेत...